सोलापूर जिल्हा

करमाळा येथे मका व तूर हमी भाव खरेदी केंद्र सुरू करावे: अमरजित साळुंके

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात चालू वर्षी खरीप २०२०-२१ हंगामात पाऊस भरपूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मका व तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे सरकारने करमाळा येथे लवकरात लवकर मका व तूर हमीभाव खरेदी केंद्र चालू करावे अशी मागणी भाजपा युवा नेते अमरजित साळुंके यांनी केली आहे.

पुढे बोलताना श्री साळुंके म्हणाले की सध्या हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे ४०० ते ८०० रुपये नुकसान होते आहे. अगोदरच शेतकरी प्रचंड अडचणींना तोंड देत असताना असा तोटा सहन करणे जिकिरीचे झालेले आहे. सध्या शासनाने मका पिकासाठी १८४० व तूर पिकासाठी ६००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे.

हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शासकीय यंत्रणेचे अपयश दिसून येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावेत अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागू शकते.

ads

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE