मकाई निवडणुकीत विरोधकांचा दावा फोल ; पाच पैकी दोघांची माघार इतरांवर लक्ष
करमाळा समाचार
विरोधकांच्या वतीने केलेला दाव्याला पहिल्या पंधरा मिनिटातच मोठा झटका बसला असून जाहीर केलेल्या सहा उमेदवारांपैकी दोन जणांनी तर आधीच माघार घेतल्याने मोठा फरक पुन्हा एकदा निवडणुकीत दिसून येणार आहे. त्यामुळे आता दोन जागा पुन्हा एकदा अविरोध होण्याच्या मार्ग मोकळा होऊ शकतो.

भिलारवाडी गटातून बाबुराव अंबोदरे आणि अमित केकान यांनी माघार घेतली आहे. तर आता सुभाष शिंदे, गणेश चौधरी, सुनिता गिरंजे यांच्या अर्जावर लक्ष आहे. तर यातुनही अजुन अर्ज माघार घेण्यासाठी यातुनही उमेदवार माघार घेण्यासाठी निघत असल्याची चर्चा होती.

पण अखेरचे अपडेट हाती आले त्यावेळी महिला राखीव व भिलारवाडी मधुन सुनिता गिरंजे, पारेवाडी गणेश चौधरी व मांगीतुन सुभाष शिंदे यांचे अर्ज बाकी राहिल्याने निवडणुक लागणार आहे.