मकाईचा रणसंग्राम अद्याप संपलेला नाही ; विचारांची लढाई लढत राहणार – राजेभोसले
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाची सत्ता स्थापन होणार असली तरी अद्यापही यातील चुरस कमी होताना दिसून येत नाही. विरोधी गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांच्या मनातून कालच्या निकालाची सल अद्यापही कमी होताना दिसून येत नाही. त्या अजूनही प्रशासनाच्या भूमिकेवरून दाद मागण्याच्या तयारीत आहे. त्या आज वरिष्ठांची संपर्क करून बाजू मांडणार आहे. तर मकाई निवडणुकीतून अजूनही आपण माघार घेतली नसून लढतच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी एक पत्र समाज माध्यमांमध्ये कार्यकर्त्यांसाठी दिला आहे. त्यामध्ये त्यांनी खंत ही व्यक्त केली आहे.

ते पत्र पुढील प्रमाणे ….
मकाई सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत महिला मतदारसंघातून मी अर्ज दाखल केलेला होता तसेच माझे सर्व सहकारी यांचे ऊस उत्पादक शेतकरी राखीव मतदार संघातून अर्ज दाखल केलेले असताना चुकीच्या पद्धतीने राखीव व महिला मतदारसंघातून सरळ सरळ चुकीचा निर्णय झालेला आहे. कारण जर ऊसाच्या अटीवर जर काही जागा असतील तर महिला व राखीव जागा कशासाठी आहेत. पण काही हरकत नाही लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहेत. विद्यमान सत्ताधारी मंडळींना आमचे अर्ज बाद झाले यामध्ये धन्यता आहे. खर तर लोकशाही मार्गाने निवडणूकीला यांनी समोर जाणे महत्वाचे असताना पण सभासद शेतकरी कामगार निराश अवस्थेत आहे. मी ज्या परिस्थितीत निवडणूकीला समोर जात आहे ती अनुभव खूप मोठा आहे.

माझी व सहकारी बंधूंची मकाई कारखान्याच्या निवडणुकीतील उमेदवारी सामान्य जनता कामगार शेतकरी सभासद बंधू यांचे विचारांची होती. ती कोणत्याही गटाच्या विरोधात नव्हती पण काय सामान्य शेतकरी सभासदांना मतदाररूपी शिक्का पेक्षा बिनविरोधच्या चर्चा पोटातच करून मतदारांसमोर जाण्यापेक्षा यांचे अर्ज बाद करण्याचा डाव आखण्यात यशस्वी खेळी करण्यात आली. पण माझा सभासद कामगार नाराज असून संघर्ष लढाई करण्याची मला सतत संपर्कातून ताकद देत असताना मी लढणार प्रामाणिकपणे ते ज्या परिस्थितीतून सामान्य सहकारी सोबतींना साथ देणार फक्त विरोधला विरोध नाही तर चुकीच्या विचारांना विरोध करत राहणार झुंजत राहणार!
–सविताराजे भोसले