करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उस बीला साठी पुणे आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

करमाळा समाचार


तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी या साखर कारखान्यांने शेतकऱ्याची ऊस बिले न दिल्याने या कारखान्याविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन साखर आयुक्त पुणे कार्यालय येथे करण्यात येणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र साखर आयुक्त पुणे यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आलेली आहे.

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी पो.जिंती, करमाळा या साखर कारखान्याने सन २०२२-२३ गाळप शेतकऱ्याचे ऊस बिल अद्याप पर्यंत दिलेले नाही. याबाबत वारंवार कळून देखील शेतकऱ्यांना बिल अद्यापही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बिल मिळणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांच्या बिलासाठी सहा सप्टेंबर रोजी हलगीनाद करून धरणे आंदोलन साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याची भूमिका घेऊन या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन शेतकऱ्यांचे ऊस बिल मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी संघटना शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.

या पत्रावर प्राध्यापक रामदास झोळ, कामगार नेते दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते यांच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE