मकाईच्या चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज ; एकमताने निवड जाहीर
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आज मा.चेअरमन निवड प्रक्रिया आज कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

आज झालेल्या या प्रक्रियेमध्ये मकाई सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन म्हणून दिनेश अंबादास भांडवलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विहित वेळेमध्ये श्री दिनेश भांडवलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पाडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

यावेळी साखर संघाच्या संचालिक रश्मी बागल, दिग्विजय बागल, कारखान्याचे विद्यमान जेष्ठ संचालक मा. बाळासाहेब पांढरे, सतीश नीळ, अमोल यादव यांच्यासह नवनियुक्त सर्व संचालक उपस्थित होते.