करमाळासोलापूर जिल्हा

मनोहर भोसले जामीन प्रकरणात सुनावणी पुर्ण ; बार्शी न्यायालयाने भोसलेंचा जामीन …

करमाळा समाचार 

महिलेवर अत्याचार प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अटकेत असलेले मनोहर भोसले यांना बार्शी न्यायालयाने जामीन नाकारला असून भोसले यांची दिवाळी पोलीस ठाण्यातच घालवावी लागेल. मागील एक महिन्यापेक्षा जास्त भोसले करमाळा पोलीस ठाण्यात आहेत यापूर्वी बारामती येथे गुन्ह्याप्रकरणी त्यांचा जामीन मंजूर केला होता. परंतु करमाळ्यातील गुन्ह्यात जामीन नाकारल्याने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महिलेवर अत्याचार तसेच बारामती येथे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले उंदरगाव चे मनोहर भोसले यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. मागील एक तारखेपासून न्यायालयीन कोठडीत असलेले मनोहर भोसले यांचा बार्शी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे भोसले यांची दिवाळी बाहेर साजरी करण्याचे स्वप्न भंगले आहे.

मनोहर भोसले यांच्या वतीने एडवोकेट रोहित गायकवाड यांनी काम पाहिले. तर सरकारी वकील म्हणून प्रदीप भोसले हे यांनी काम पाहिले आहे. काल सदर प्रकरणावर बार्शी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीचा आदेश आज देण्यात आला आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE