करमाळासोलापूर जिल्हा

रावगावात मांजरी सारखी दिसणाऱी वेगळेच पिल्लु आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण ; काही दिवसापूर्वी शेजारच्या तालुक्यात बिबट्याचे होते वास्तव्य

करमाळा समाचार 

रावगाव ता. करमाळा येथे श्री. खाडे यांच्या शेतात एक छोटे पिल्लू आढळून आले आहे. नेमकी ते छोटे पिल्लू कशाचे आहे असा संभ्रम सध्या निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी शेजारील तालुक्यात बिबट्या चे वास्तव्य होते. त्यामुळे हे बिबट्याची तर पिल्लू नसावे अशीच संशय व्यक्त केला जात आहे.

रावगाव येथे आपल्या शेतात काम करत असताना रामदास खाडे यांच्या येथील एक कर्मचारी विहिरीच्या कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटेसे पिल्लू ओरडत असल्याचे त्याला निदर्शनास आले त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर ते पिल्लू मांजरीसारखे दिसत होते. परंतु मांजर ही नव्हती तसेच ओरडण्याचा आवाज ही साधारण मांजरीच्या पिल्ला सारखा नसल्याने इतर कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी बिबट्या त्याठिकाणी येईल या भीतीने सध्या तो परिसर सोडून घरी गेले आहेत. तर सध्या फक्त श्री. खाडे हेच शेतीत असल्याने ते पिल्लू कशाचे आहे याची पाहणी करत आहेत.

पिल्लाचा आकार साधारण मांजरीच्या पिल्लांची सारखाच आहे. परंतु त्याची नखे व ओरडण्याचा आवाज हा साधारण मांजरीच्या पिल्ला सारखा नसल्याने संशय वाढला होता. तसेच एकच पिल्लू कालपासून याच परिसरात ओरडत असल्याने इतर पिल्ले व संबंधित पिल्लांची मादी कुठे आहे. याबाबत कसलीही कल्पना आलेली नाही. त्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिक मध्ये भीतीचे वातावरण आहे.

यासंदर्भात आम्ही मोहोळ येथील फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता. त्यांनी सदरचे पिल्लू हे रान मांजराचे असून या पासून कसलाही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांना या सारखे पिल्ले आढळून आली तर यांच्यापासून घाबरून जाऊ नका असे आवाहन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE