मनोहरमामावर अखेर गुन्हा दाखल ; दोन लाखांची फसवणुक केल्याचा आरोप
करमाळा समाचार
बारामती येथील 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिल्यानंतर मनोहर भोसले (manoharmama) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड कॅन्सर बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला,साखर, भंडारा खाण्यास देऊन विशाल वाघमारे, नाथबाबा शिंदे व मनोहर भोसले यांच्याविरोधात वेळोवेळी संगणमत करून दोन लाख 12 हजार 500 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनोहर भोसले यांच्या विरोधात मागील अनेक दिवसांपासून विविध तक्रारीं येत होत्या. परंतु त्यावर फक्त चौकशी सुरू असल्याचे समोर येत होते. परंतु आता बारामती पोलिसांनी मनोहर भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यापूर्वीही करमाळा तालुक्यात इंदापूर येथील रवींद्र राघू म्हेत्रे यांनी फसवणूक झाल्या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यावर अद्यापही चौकशी सुरू आहे.

मनोहर भोसले यांच्यासह तिघांवर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा 2013 चे कलम 3,2 औषध चमत्कारी उपाय अधिनियम व नियम 1954 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.