करमाळासोलापूर जिल्हा

मकाई निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात तिसऱ्या दिवशी पहिला अर्ज दाखल

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. मागील १२ तारखेपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात असताना एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नव्हते, तर आज पहिले नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे. यावेळी समर्थकांसह उपाध्यक्ष बाळासाहेब पांढरे यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र दाखल केली आहे. तर अद्याप इतर गटांसाठी कोणीही दाखल केलेले दिसून येत नाही. एका उमेदवारास साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे वेळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागत आहे. तर १८ मे पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

साखर साखर कारखान्याच्या पारेवाडी गटात एकूण तीन जागा असून सर्वात पहिला पांढरे यांचा एक अर्ज याठिकाणी आलेला आहे. यावेळी त्यांच्यासह माजी संचालक रामभाऊ हाके, माजी पंचायत समीती सदस्य मारुती सोनवणे, उद्योजक जयकुमार भाटीया, उमरड सरपंच बापु चोरमले, दिव्हेगव्हानचे मोहनराव खाटमोडे, बाळासाहेब मोरे, विठ्ठल मोरे, सचिन काळे, राजेंद्र सोनवणे, माजी सरपंच पारेवाडी महादेव पांढरे, संतोष गरुड, दादासाहेब भोसले, सचिन पांढरे, नितीन पांढरे, सचिन पांढरे, प्रशांत पांढरे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सदरच्या निवडणुकीत १६ हजार ८५८ सभासद हे मतदानाचा हक्क बजावणार आहे. पाच गटातून ११ तर इतर पाच आरक्षित गटातून सहा जागांची निवड होणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक गट भिलारवाडी २ , पारेवाडी गट ३ , जागा चिखलठाण गट २, वांगी गट २, मांगी २ तर राखीव मतदार संघांमध्ये बिगर उत्पादक सहकारी व पणन संस्था यामध्ये १, महिला राखीव मध्ये २, अनुसूचित जातीमध्ये १, मागासवर्गीय मध्ये १, भटक्या विमुक्त जातीमध्ये १ जागा असे एकूण १७ जागांवर निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख १२ मे २३ ते १८ मे २३ आहे हे नामनिर्देशन तहसिल कार्यालय करमाळा येथे ११ ते तीन वाजे पर्यत मुदत असणार आहे. छाननी १९ मे माघार २२ मे ते ५ जुन २३ दरम्यान ११ ते ३ पर्यत असणार आहे. मतदान १६ जुन २०२३ रोजी होणार आहे. मतमोजणी १८ जुन रोजी होईल तर लगेचच त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येणार आहे अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी दिली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE