श्री किर्तेश्वर देवस्थान परिसरात अमृत रोपवाटीका उभारणार- मनोज राऊत
करमाळा समाचार संजय साखरे
– करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि उजनी धरणाच्या नयनरम्य परिसरात भिमा नदी पात्राजवळ अमृत रोपवाटीका ( भव्य गार्डन) उभारण्याचे आज केत्तुर येथे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांनी घोषित केले. केत्तुर येथील किर्तेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांची लोकवर्गणी, ग्रामपंचायत केत्तुर आणि किर्तेश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट केत्तूर च्या माध्यमातुन वृक्षारोपण व परिसर स्वच्छता करण्यात येत आहे. येथील सुमारे पाच एकर परिसरावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आवाहना नुसार , आमदार. संजयमामा शिंदे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे प्रेरणेने करमाळा तालुक्यातील अमृत रोपवाटीका साकारण्यात येणार आहे.

या रोपवाटीकेत देशी झाडासंह, आयुर्वेदीक वनस्पती, विविध फुल आणि फळझाडे यांचे वृक्षारोपण करण्यात येणार असुन,यासाठी तालुक्यातील ज्यां लोकांना या रोपवाटीकेत आपले स्वतःच्या नावाचे झाड कायमस्वरूपी लावायचे आहे त्यांनी ग्रामविकास अधिकारी श्री. जगदाळे व प्रशासक श्री. म्हेत्रे साहेब यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले आहे.आज येथे किर्तेश्वर मंदीरात सकाळी आरती करून ही घोषणा करण्यात आली. श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून श्री किर्तेश्वर देवस्थान परिसराचे ग्रामस्थांनी केलेल्या सुधारणेचे राऊत यांनी कौतुक केले.
तसेच सुरुवातीला झाडासाठी प्रत्येकी एक हजार रुपये बीडीओ मनोज राऊत आणि अॅड अजित विघ्ने यांनी ग्रामविकास अधिकारी यांचे कडे जमा केले. याप्रसंगी शिवाजी पाटील, विलास कोकणे,उदयसिंह मोरे- पाटील, अजित विघ्ने,विजय येडे,रामचंद्र देवकते, नवनाथ देवकते,बाळासाहेब भरणे,दत्ता कोकणे, अविनाश जरांडे,शशिकांत जरांडे, शहाजी कोकणे,अमोल जरांडे,आबासाहेब पाटील,संतोष कानतोडे,औंदुबर कोकणे,तानाजी कनिचे,दगडु कनिचे,संतोष कानतोडे,पिंटू खाटमोडे,लक्ष्मीकांत पाटील यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
