करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथे रक्तदान शिबीरामध्ये १०३ जणांनी केले रक्तदान ;

 प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा येथे रक्तदान शिबिरामध्ये 103 जनाने केले रक्तदान शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करमाळा शहरातील क्षत्रिय राजपूत समाज करमाळा यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शिवसेना उपशहरप्रमुख पंकज परदेशी यांनी पत्रकारांना माहिती दिली.

याबाबत परदेशी पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले, आवाहनाला प्रतिसाद देत करमाळा शहरातील क्षत्रिय राजपूत समाजाने परिश्रम घेत मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना क्षत्रिय राजपुत समाजाच्या वतीने प्रेशर कुकर तसेच प्रमाणपत्र यावेळी वितरित करण्यात आले.

क्षत्रिय राजपूत समाज बरोबर इतर समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणात रक्तदान केले प्रसंगी सर्व रक्तदात्यांना सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांच्यावतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील 103 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

यावेळी रक्तदान शिबिराला शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, उपजिल्हाप्रमुख भारत नाना अवताडे, नगरसेवक महादेव अण्णा फंड, भाजपाचे शहर प्रमुख जगदीश अग्रवाल, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया, सचिन साखरे, माजी नगरसेवक डॉ श्रीराम परदेशी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दीपक चव्हाण, गणेश परदेशी, योगेश परदेशी , संदीप परदेशी, सौरभ परदेशी आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

सदर भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख पंकज परदेशी सहित समस्त सकल क्षत्रिय समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ज्या रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांना रक्ताची आवश्यकता भासल्यास अशांनी श्रीगणेश ब्लड स्टोरेज सेंटर व श्री सेवा क्लीनिक करमाळा येथे संपर्क साधावा असे परदेशी यांनी बोलताना सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE