अनेक फोन तक्रारीचे येतात पण एक फोन आला तो सुखद धक्का देणारा – वीणा पवार
करमाळा समाचार
करमाळा येथील येथील स्क्रॅप मर्चंटचे मालक पप्पु भंवरशेठ चव्हाण यांनी कोरोना काळात स्वतःची महिंद्रा जीप हि शववाहिका म्हणून वापरण्यास मोफत नगरपालिकेस दिली. मे महीन्याच्या सुरुवातीस कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला होता. या काळात मृत्युचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते.


यावेळी करमाळा तालुक्याचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व मुख्याधिकारी यांच्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा सुरु असताना कोरोना मुळे होणारे मृत्यू, मृत्युपश्चात नातेवाईकांना होणारा तास या बद्दल चर्चा सुरू होती. दरम्यान यावेळी तेथे उपस्थित पप्पू चव्हाण यांनी आपण तयार असाल तर मी माझी महिंद्रा गाडी शववाहिका म्हणून वापरणेस देतो असे त्वरीत सांगीतले.
पप्पू चव्हाण यांची सामाजीक बांधीलकी व जाणीव पाहून माजी आ. जगताप, नगराध्यक्ष जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार यांनी आभार व्यक्त केले
अनेक फोन येतात अधिकतर तक्रारीचे पण काही असेही येतात सुखद धक्का देणारे….ं”मँडम माझी गाडी उद्या तुमच्या ताब्यात देतो, कोरोणा रूग्णांच्या सेवेसाठी वापरा” असे म्हणत पप्पू चव्हान ने दुसऱ्या च दिवशी करमाळा नगरपरिषदेला गाडी ताब्यात दिली. संकटाच्या काळात मोलाची मदत झाली. पप्पू चव्हाण यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
–वीणा पवार मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद.