गणेशोत्सवानिमित्ताने बैठक संपन्न ; अटींच्या आधीन राहुन करावी गणेशोत्सव
करमाळा समाचार
करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात गणेशोत्सवा अनुषंगाने गणेश उत्सव मंडळ यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंडळांकडून सूचना घेण्यात आले आहेत. तर गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याबाबत तहसीलदार समीर माने व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सूचना दिल्या आहेत.

गणेश मूर्तीची उंची चार फूट पेक्षा जास्त असू नये तसेच कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजंत्रीला परवानगी नसणार आहे. त्याशिवाय मंडळांनी रस्त्यावर मंडप टाकण्याला बंदी घालण्यात आली आहे. शक्यतो सार्वजनिक उपक्रम टाळावेत व घरीच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर गणपती विसर्जनाच्या वेळी विसर्जन करण्याऐवजी गणपती दान करावेत अशा सूचना यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांसह करमाळा शहरातील सावंत गल्ली, व्यापारी तरुण मंडळ, धर्मवीर प्रतिष्ठान यासह नगरसेवक व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये नगरसेवक संजय सावंत, भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.