करमाळासोलापूर जिल्हा

कमला भवानी शुगर च्या तिसऱ्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता

प्रतिनिधी – संजय साखरे

तालुक्यातील पांडे येथील कमला भवानी साखर कारखान्याच्या तिसऱ्या गाळप हंगामाचा सांगता समारंभ आज ११ मार्च रोजी कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री विक्रम दादा शिंदे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष श्री वामन दादा बदे, मा. संचालक श्री तानाजी बापू झोळ,bयुवक नेते सुनील बापू सावंत, अशपक जमादार, सुजित बागल, विनय ननावरे, मानसिंग खंडागळे, तात्या मामा सरडे, राजेंद्र पवार यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.

कारखान्याने चालू गाळप हंगामात४७०००० मे टन ऊस गाळप करून ४१८००० पोती साखर उत्पादन केली आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून २५६७५९५० युनिट एवढी वीज निर्मिती केली आहे.
कार्यक्रमा च्या सुरवातीला शेवटची ऊस खेप घेऊन आलेल्या ट्रॅक्टर चे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याने चार लाख सत्तर हजार ममे टन ऊस गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १० च्या आसपास राहिला आहे. साखरेला उठाव नसल्याने साखर विक्रीकर व दरावर त्याचा परिणाम झाला आहे. साखरे चा विक्रीकर किमान ३६ रुपये प्रति किलो करणे आवश्यक आहे तरच साखर उद्योग या संकटातून बाहेर पडेल. शेतकऱ्यांनी फक्त २६५ जातीच्या ऊसाची लागवड न करता अधिक साखर उतारा देणाऱ्या ८६०३२, ८००५, ४३४ , १०००१या जातीच्या ऊसाची लागवड करावी.

आगामी काळात सह वीज निर्मिती तुन वीज निर्मिती वाढवली जाईल. इतर कारखान्याच्या बरोबर दर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून यापुढी ल काळात डिस्टलरी प्रकल्प उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे .यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देता येईल. पुढील वर्षी ऊसतोड यंत्रणा वाढवून जास्तीत जास्त गाळप करण्यावर भर राहील असे कारखान्याचे चेअरमन श्री विक्रम दादा शिंदे यांनी सांगितले.या अशा काळात सर्व ऊस उत्पादन करणारे शेतकऱ्यांनी कमलाई शुगर वर विश्वास ठेवून सहकार्य केले. तसेच वाहतूक ठेकेदार, तोडणी कामगार,कारखान्याचे सर्व सप्लायर,व्यापारी, साखर व्यापारी ,सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांचा कारखान्याच्या प्रगती मध्ये सहभाग आहे. या सर्वांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमा च्या सुरवातीला चालू गाळप हंगामात कारखान्याला सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी,वाहन मालक,तोडणी मुकादम यांचा कारखान्याच्या वतीने रोख रक्कम ,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायरेक्टर जनरल श्री डांगे साहेब यांनी केले तर सुत्रसंचालन मुख्य शेती अधिकारी श्री जगदाळे साहेब यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रा तील साखर कारखान्याना यंदा कमी साखर उतारा चा फटका बसला.२६५ जातीच्या ऊसाला साखर उतारा कमी असल्याने त्याचा साखर उत्पादन वर परिणाम झाला.पुढील हंगामात कारखाना प्रतिदिन ६००० मे टनाने चालवण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
एच. बी. डांगे
कार्यकारी संचालक, कमलाई शुगर.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE