पोलिस ठाण्यात बॅंक चालक व पेंट्रोल पंप मालकांची बैठक
करमाळा समाचार
आज करमाळा पोलीस ठाणे येथे सर्व बँका अधिकारी तसेच पेट्रोल पंप मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मीटिंग दरम्यान सुरक्षिततेविषयी समस्या जाणून घेऊन त्या संबंधित संदर्भात उपायोजना करणेबाबत कळवले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.

यावेळी उपस्थित बँक तसेच पंप धारकांना पुढील सूचना देण्यात आल्या.

बँका अधिकाऱ्यांनी बँक शाखा तसेच एटीएम ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, 24 तास सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, कॅश ने आण करण्यासाठी शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावा शिवाय अलाराम सिस्टीम बसून घ्यावी.
तर पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत 24 तास सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. पेट्रोल पंपाच्या कडेने तारेचे कंपाउंड मारून घ्यावे. अलाराम सिस्टीम बसून घ्यावी. पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड व फोटो व कर्तव्य बाबत माहिती अद्यावत ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.