करमाळासोलापूर जिल्हा

भुसंपादनाबाबत आमदार संजयमामांची अधिकाऱ्यासोबत बैठक

प्रतिनिधी – करमाळा समाचार 


करमाळा – माढा मतदार संघातील भुसंपादन, पुनर्वसन , त्यांचा मोबदला आदी विषया संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. २८ ऑगस्ट रोजी विशेष बैठक संपन्न झाली.
यावेळी करमाळा तालुक्यातील मौजे कविटगाव, रिटेवाडी, वीट, कोर्टी, कुसकरवाडी, झरे, सावडी, गोरेवाडी तसेच इतर सर्व लाभक्षेत्रातील गावांचे पुनर्वसीत गावठाणातील भूखंड मोजणी, भुखंडांचे पेमेंट, आदीबाबत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या सर्व बाबींबर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आ . संजयमामा शिंदे यांनी दिली .
या प्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप, महापालिका आयुक्त श्री शिवशंकर , भूसंपादन अधिकारी सूर्यवंशी , विशेष भूमापन अधिकारी श्री सानप, उद्धव दादा माळी आदी उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE