एका चुकीमुळे मोबाईल चोरी उघड ; कर्जतच्या आरोपीस करमाळा पोलिसांकडुन अटक
करमाळा समाचार
लबाडीने विधवा महिलेचा मोबाईल परस्पर वापरत असताना बिघडल्यानंतर दुरुस्तीला दिल्यानंतर imei नंबरच्या सहाय्याने पो नि पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोना निंबाळकर, पो कॉ/ मनिष पवार, पो कॉ/सोमनाथ जगताप यांनी शोध लावला व कर्जतच्या संशयितांस जेरबंद केले आहे.

विधवा महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने व मोबाईल असा माल फसवणूक करून काढून घेऊन गेला होता. गेले माला पैकी imei नंबर वरून आरोपीने याने सदर चा मोबाईल दुरुस्ती करण्या करिता कर्जत येथील मोबाईल शॉपी मध्ये ठेवला होता. त्यावरून त्याचा imei नंबर ट्रेस करून आरोपी नामे प्रकाश आजिनाथ गायकवाड वय 50 वर्ष राहणार बेनवडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर याला आज रोजी ताब्यात घेतले आहे.
