सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री जाधव
सोलापुर –
सोलापूर जिल्हा न्यायालयीन तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेची पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे कोरोना नियमांचे पालन करून संवाद , विचारविनिमय व समन्वयाच्या माध्यमातून पार पडली. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष या पदाकरिता श्री सदाशिव जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

श्री सदाशिव जाधव यांचे शिक्षण – एम.ए., एम. एड., एलएल. बी. झाले असून सध्या, सह दिवाणी न्यायालय बार्शी येथील न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सांगली, तासगांव, आटपाडी, माळशिरस, करमाळा, पंढरपूर या न्यायालयामध्ये कामकाज केले आहे. सन २००१ ते २००५ अखेर श्री जाधव हे सांगली जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव होते. विद्यार्थीदशेपासूनच त्यांना सामाजिक कार्याची फार आवड आहे.
जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर श्री सदाशिव जाधव यांचे सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
