करमाळा तालुक्यात वीट शिवारात विवाहीत महिलेचा खुन ; अतिप्रसंग झाल्याचा संशय
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील वीट येथे 35 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची घटना घडली आहे. यावेळी सदरच्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेचा तपासासाठी पोलिस वीट गावात दाखल झाले आहे.

वीट तालुका करमाळा येथील भाग्यश्री गाडे ही 35 वर्ष विवाहित महिला सकाळी शेताकडे गेलेली असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आहे. दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यावेळी पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. तर त्या महिलेच्या अंगावर काही ठिकाणी जखमा आहेत. तर तिला सध्या करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

तरी अद्याप खून कोणत्या कारणामुळे किंवा कशा पद्धतीने झाला हे सांगणे अवघड असून तिच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार उघडकीस येणार आहे. तरी डॉग स्कॉड सह करमाळा पोलीस सदर ठिकाणी दाखल झाले आहेत व पुढील तपास करत आहेत.