करमाळा तालुक्यात पांगरे येथे युवकाचा खुन ; खुन्याचा शोध सुरु
करमाळा समाचार
केम ता. करमाळा येथील मच्छीमार महेश शिंदेला अज्ञात व्यक्तीने वार करून जीवे ठार मारले आहे. सदरचा प्रकार पहाटे साडेपाच नंतर उघडकीस आला प्रकरणाची चौकशी करमाळा पोलीस वेगात करत आहेत. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भेट दिली असून तपास वेगाने फिरत आहे.

महेश शिंदे हा पांगरे सांगवी परिसरात मच्छीमारी करण्यासाठी राहत होता. या ठिकाणी छोट्या कुपी मध्ये राहून पहाटे मच्छीमारीसाठी जात होता. त्याचा भाऊ रोज सकाळी त्या ठिकाणी पोहोचत असे. आजही नित्यनियमाप्रमाणे भाऊ पोहोचला परंतु आज महेश हा मच्छिमारी करताना आढळून आला नाही. तर त्या गुपितच त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात नोंद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिले आहे.
