करमाळा तालुक्यातील शेलगावात एकाचा खुन ; पोलिसा घटनास्थळी दाखल
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात अज्ञात कारणाने अनोळखी इसमाने एका वृद्ध या व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार हा शेलगाव क (वीराचे) येथे घडला आहे. सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी भेट घेतली. पोलिसांचा तपास सुरू आहे. वृद्ध व्यक्तीही सदर ठिकाणी एकटीच राहत होती. सकाळी परिसरातून काही जण तिथे पोचल्यानंतर घटना उजेडात आली.

शेलगाव ता. करमाळा येथील भरत सोमनाथ माने वय ५७ हे शेती करण्यासाठी एकटेच शेलगाव परिसरात राहत होते. आणि रात्री स्वतःच्या राहत्या घरी वस्तीवर झोपलेले असताना त्यांच्या कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीने खून केला आहे. सदर घटनास्थळाला पोलिसांनी भेट दिल्यानंतर मृत शरीर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले तर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
