करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पत्रकारांची नूतन कार्यकारिणी जाहीर; पत्रकारांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

करमाळा : (प्रतिनिधी)


करमाळा तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या ‘करमाळा तालुका पत्रकार संघ (सक्रिय)’ ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अनुभवी व तरुण पत्रकारांचा समतोल साधत सर्वसमावेशक टीमची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी शितलकुमार मोटे, तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल दामोदरे यांची निवड करण्यात आली आहे.
संघाला ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभणार असून ॲड. डॉ. बाबुरावजी हिरडे, जयंत दळवी, आलिम शेख, अशपाक सय्यद व किशोरकुमार शिंदे हे सल्लागार म्हणून कार्य पाहणार आहेत.

पदाधिकारी असे
कार्याध्यक्ष – सिद्धार्थ वाघमारे
प्रवक्ते – आण्णासाहेब काळे
सचिव – ॲड. विशाल घोलप
सहसचिव – ॲड. सचिन
प्रसिद्धी प्रमुख – राजाराम माने
संघटक – शेखर स्वामी
संपर्क प्रमुख – नाना पठाडे, संजय चौगुले

कार्यकारिणी सदस्य
विशाल परदेशी, राजेश गायकवाड, उमेश पवळ, गणेश जगताप, अंगद भांडवलकर, हर्षवर्धन गाडे, गजेंद्र पोळ, सुनील भोसले, विजय निकत, जयंत कोष्टी, धर्मराज दळवे, प्रशांत भोसले, प्रवीण अवचर, गौरव मोरे, सुयोग झोळ, अतुल बोकन, हरिभाऊ हिरडे, दस्तगीर मुजावर, नंदकुमार वलटे, संजय जाधव, बाळासाहेब सरडे, धनंजय निर्मळ व रणजीत शिंदे.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष शितलकुमार मोटे म्हणाले, “ग्रामीण भागातील पत्रकारांच्या सुरक्षेसह त्यांच्या अडीअडचणींमध्ये संघ कायम पाठीशी उभा राहील. संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.”

उपाध्यक्ष प्रफुल्ल दामोदरे म्हणाले, “पत्रकारिता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघ सक्रिय भूमिका बजावेल.”
नवीन कार्यकारिणीच्या निवडीचे तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE