करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

CNG धारकांना खुशखबर !!! ; करमाळ्यात लवकरच सुरु होणार CNG पंप

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील सीएनजी वाहन चालकांसाठी खुशखबरी असून लवकरच करमाळा येथे सीएनजी पेट्रोल पंपाचा भव्य शुभारंभ होणार आहे. त्यामुळे परिसरातून सीएनजी भरण्यासाठी होणारी अडचण आता नक्कीच दूर होताना दिसणार आहे. करमाळा येथील ज्येष्ठ नेते विलासरावजी घुमरे यांच्या माध्यमातून श्री दिगंबररावजी बागल पेट्रोलियम करमाळा या ठिकाणी या पंपाचे 6 फेब्रुवारी रोजी उद्घाटन केले जाणार आहे.

करमाळा तालुक्यात सीएनजी वाहनधारकांना दिलासा यातून मिळणार आहे. करमाळा शहरात अनेकांची सीएनजी गाड्या घेण्याची इच्छा असतानाही केवळ करमाळा तालुक्यात सीएनजी पंप नसल्यामुळे ती इच्छा पूर्ण करता येत नव्हती. तर आता त्या सर्व वाहनधारकांना व घेऊ इच्छिणाऱ्यांना ही आनंदची गोष्ट समजत आहे.

तर यापूर्वी करमाळा शहरातून तसेच तालुक्यातून जवळपास चापडगाव येथील 20 ते 25 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होते. त्यातही सीएनजी पुरवठा कधी चालू कधी बंद असल्यामुळे नाहक हेलपाटे मारावे लागत होते . आता तो प्रश्न मिटला असून करमाळा शहरातच हा पंप सुरू होत असल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

ad
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE