कंदरचे नुतन अधिकारी तुषार शिंदे यांच्यासह नुतन अधिकाऱ्यांचा निंभोरेत सन्मान
करमाळा समाचार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) राज्य शासकीय कामगार अधिकारीपदी निवड झालेल्या आणि आपल्या गावच्या सुकन्येचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे. सदरचा कार्यक्रम उद्या दि. 08/07/2023 रोजी सायंकाळी ठीक 6:45 वाजता निंभोरे येथे होणार आहे. यावेळी प्रमुख सत्कारमूर्ती कंदरचे तुषार शिंदे(नुतन ifs), पल्लवी गणेश मारकड व समाधान संदीपान वळेकर याची निवड रेल्वे विभागामध्ये वरिष्ठ लेखापालपदी झालेली आहे यांच्यासह इतरांच होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या तालुक्यातील PSI परीक्षेतील यशप्राप्त सत्कारमूर्ती..
दत्तात्रय एकनाथ मिसाळ, कोर्टी
विद्या किसन कळसे
अमित गौतम लबडे
सागर जयवंत पवार
सोनाली महादेव हनपुडे
निखिल हिरामण सरडे
श्रीकांत लक्ष्मण गोडगे
अभिजित दत्तात्रय ढेरे
ओंकार दत्तात्रय धेंडे

या करमाळ्याच्या एकूण नऊ सुपुत्रांनी/सुकन्यानी घवघवीत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी घातली आहे. त्यांचा यथोचित सत्कार आयोजित केलेला आहे. तरी सर्वानी निंभोरे येथे उपस्थित रहावे.