बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नवी रणनिती ; आता पर्यतची शोधाशोध निष्फळ
करमाळा समाचार
सकाळी चिखलठाण येथे लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर संपूर्ण यंत्रणा या बिबट्याला पकडण्यासाठी सज्ज झाली आहे. सकाळपासून त्या बिबट्याची परिसरातील उसाच्या फडामध्ये शोधाशोध सुरू असली तरी हीच आतापर्यंत बिबट्या कोणाच्या हाती लागला नसल्याने संबंधित ठिकाणी असलेल्या झाडाला आग लावून इतर ठिकाणी सापळे राखले जाणार गेले आहेत. तर तब्बल पाच एकरांचा हा सध्या पेटविण्याचे काम सुरू आहे.

सध्या घटनास्थळी दहा पथके, शार्प शूटर व पिंजरे, भूल देणाऱ्या टीम हा असे सर्व मिळून एकाच वेळी ऑपरेशन करत आहेत. या वेळी बिबट्या निघून गेला तर पुन्हा मिळविणे अवघड असल्याचे त्यांना माहित आहे. त्यामुळेच सर्व बाजूंनी जवळपास दीडशे ते दोनशे कर्मचारी व गावकरी यांच्या मदतीने संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. या ठिकाणी आमदार संजय शिंदे तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनीही भेट दिली आहे. संबंधित बिबट्या जेरबंद करा अथवा ठार करा अशा सूचना ही दिल्या आहेत. तर मुलीला मारल्या पासून गावकऱ्यांमध्ये बिबट्या बाबत रोष अधिकच वाढला आहे.

पण सकाळी बारा वाजल्यापासून ते आत्ता सहा वाजेपर्यंत शोधाशोध सुरू असली तरी फक्त एकदाच बिबट्या दिसला. त्यानंतर आतापर्यंत न दिसल्याने बिबट्या नेमका तिथेच आहे का दुसरीकडे गेला असाही संशय निर्माण होत आहे. पण अतिशय धाडसाने वन विभागाचे कर्मचारी उसाच्या फडात व केळीच्या बागेत शोधाशोध घेत असून संबंधित सर्व परिसर घेरा घातलेला असल्याने बिबट्या आत असल्यास पळून जाणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. पण यातूनही बिबट्या वाचल्यास पूर्ण मेहनत वाया जाणार हे नक्की.