तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खा.निंबाळकर करमाळ्यात येणार
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सोमवार दि. 15 /03 /2021 रोजी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यामध्ये ते 12:30 ते 4:30 या वेळेमध्ये नवनिर्वाचित सरपंच यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांना भेडसावणारे प्रश्न येणाऱ्या अडचणी संदर्भात विचार विनिमय करणार आहेत. तसेच सर्व नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे खासदार निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

तसेच भाजपा नूतन तालुका कार्यकारणी व जिल्हा पदाधिकारी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत व आगामी काळामध्ये पार्टीची ध्येय धोरणे व त्यांना कशा प्रकारे तोंड देता येईल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. चिवटे हे खासदार साहेबांना तालुक्यातील समस्या व त्यांचे निराकरण याविषयी माहिती देणार आहेत.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, विस्तारक भगवान गिरीगोसावी , तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव , राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय नागवडे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे उपस्थित होते.