E-Paperसोलापूर जिल्हा

तह झालेल्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्या ऐवजी नवा पर्याय

करमाळा समाचार -( बेळगाव )

पिरनवाडीमध्ये क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याचा वाद झालेल्या तहात मिटल्यानंतर पिरनवाडी ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतीच्या वतीने पिरनवाडी क्रॉस येथे ‘छ्त्रपती शिवाजी महाराज’ चौक या नावाचा नामफलक बसविण्यात आला आहे. पिरनवाडी येथील चौकात क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसविण्यात आला होता. हा मुद्दा गाजला होता. त्यानंतर एडीजीपी अमरकुमार पांडे आणि जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी घेतलेल्या गावकर्यांच्या बैठकीत तहात तोडगा काढत हा वाद मिटवला होता.

ज्या पिरनवाडीतील चौकात संगोळी रायान्ना यांचा चाहत्यांनी पुतळा रातोरात स्थापित केला होता. त्या ठिकाणी पुतळा कायमस्वरूपी स्थापन करावा आणि त्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्याचे ठरले होते. मात्र कर्नाटक रक्षण वेदिकेच्या अध्यक्ष नारायण गावडे यांनी याबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून या भागातील जनतेच्या मनात आणखी तणाव वाढला होता. मात्र आज गुरुवारी सकाळी दोन्ही समाज आणि समस्त शिवभक्तांच्या उपस्थितीत या चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाचा फलक बसवला आहे. या नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. चौकात प्रतीक म्हणून लावण्यात आला ” छत्रपती शिवाजी महाराज चौक ” नावाचा फलक कोणत्याही दबावाला न पडता फलक लावण्यात आला आहे.

प्रारंभी फलकावर लावलेला भगवा ध्वज हटवा असे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र शिवप्रेमींनी तो काढला नाही. सकाळी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विधिवत पूजा केली. त्यानंतर नाक्यावरील तो परिसर स्वच्छ करून जेसीबीने खडा मारुन तो फलक बसवला. यावेळी फलक पूजन झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय नामाचा जयघोष झाला. या जागेवर छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे. ती जागा सरकारी नसून मंडळाच्या मालकीचे आहे. ती जागा त्यावेळी शिवमुर्ती कमिटीच्या सदस्यांनी खरेदी करून त्याची शासनाकडे नोंद केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE