करमाळासोलापूर जिल्हा

मराठा सोयरीक संघाच्या वतीने वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन

करमाळा समाचार -संजय साखरे


करमाळा मराठा सोयरीक संघाच्यावतीने करमाळा येथे रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी तिसऱ्या मराठा वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्याचा सर्व गरजू व्यक्तींना लाभ घ्यावा असे आव्हान मराठा सोयरीक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवार दिनांक आठ मे दोन हजार बावीस रोजी श्री देवीचा माळ येथील अथर्व मंगल कार्यालयामध्ये या मेळाव्याचे आयोजन सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी दिनांक ४ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत फोनवरून आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे .

हा मेळावा पूर्णपणे नि:शुल्क असून या मेळाव्याच्या नाव नोंदणीसाठी प्राध्यापक नागेश माने (९६६५६६७८७७), प्रकाश लावंड (९०२१४९७९७७), गोरे गुरुजी (९६८९६६४९९४), पप्पू चांदगुडे (९९२१५८७४८४), अंगद बिडवे (९८५०६४८२८७), हरीभाऊ फंड (९४२३२२१८८६), प्रा. दत्तात्रय मस्कर (९७६३०४६९०२), मोरेश्वर पवार (९६१९७४५१२३), ऍड मांगले (९९२१८१८१७९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE