करमाळासोलापूर शहर

कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जगताप यांचा वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम

करमाळा-

अखिल भारतीय काँग्रेस आय चे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वायफळ खर्चाला फाटा देवुन चिंतामणीदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापराव जगताप मित्र मंडळाच्या वतीने या सर्व उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना मोफत आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे उद्घाटन करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणीदादा जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. होते.सर्वप्रथम करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी मातेचे दर्शन घेण्यात आले.

तद्नंतर करमाळा नगरपरिषेदेचे माजी नगरसेवक राहुलभैय्या जगताप , सन्माननीय संतोष फाटके यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजातील गोर गरीब तसेच अर्थिक व दुर्बल घटकातील नागरीकांना मोफत एक महीण्याच्या बी.पी.व शुगरच्या औषध गोळ्याचे वाटप करण्यात आले.शेकडो नागरीकांनी याचा लाभ घेतला.तसेच गुरुगणेश दिव्यरत्न गो पालन संस्थेमध्ये चारा वाटप करण्यात आले.श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपुर्णा योजनेस अन्नदान करण्यात आले.

दिवसभरामध्ये अनेक सामाजिक संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी समक्ष भेटुन सत्कार केला.अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळा अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष दस्तगीर पठाण, उपाध्यक्ष साहील सय्यद यांच्या वतीने श्री प्रतापराव जगताप यांच्या दिर्घायुष्यासाठी करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी मातेची आरती करुन शहरातीलच करमे मौलाली दर्गाह येथे चादर अर्पण करण्यात आली.

करमाळा शहरातील गोरगरीबांना मोफत तांदुळ वाटप करण्यात आले.यावेळी काँग्रेस आय पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.श्री उत्तरेश्वर सावंत,योगेश राखुंडे,सचिन कटारिया ,सुजय जगताप,अमोल पवार, नितीन चोपडे,विजय तळेकर,निखील कदम,संदेश माळवे, राहुल जाधव आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE