राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला सरपंचांचा गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या वतीने शरद पवार साहेबांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी ११ वाजता गुरुकुल प्रशाला, कोर्टि येथे उत्तुंग काम करणाऱ्या महिला सरपंच, गुणवंत शिक्षिका, कोव्हिड काळात उत्कृष्ट काम केलेल्या परिचारिका,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी महिला सरपंच लता मारकड(उमरड), सविता भगवान तनपुरे (वरकटने), गायत्री महेशकुमार कुलकर्णी (मांजरगाव), मनीषा बाळासाहेब कावळे (रामवाडी) तसेच शिक्षिका ज्योती बोटकर, ज्योती शिंदे, गोसावी मॅडम, टेकाळे सिस्टर, अंगणवाडी सेविका अंजना मेढे, आशा वर्कर हसीना शेख यांचा गुणगौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी पवार साहेबांच्या महिला धोरणा विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलादेवी झांजुर्णे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती ताई साखरे , adv सविता शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला चवरे, शहराध्यक्ष राजश्री कांबळे, युवा नेते श्रीकांत साखरे युवा नेते गौरव झाजुर्णे, असपाक जमादार, बाळासाहेब कावळे, महेशकुमार कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट अशे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नलिनी ताई जाधव यांनी केले, सरपंच मनीषा कावळे यांनी छान मनोगत व्यक्त केले. महिलांविषयी असे कार्यक्रम ग्रामीण भागात राबवण्याची गरज आहे. साहेबांच्या वाढदिवसानिम्मित आमचा महिला सरपंचांचा सन्मान केला हे आमच्यासाठी खूप भूषणावह आहे. अनेक मान्यवरांनची मनोगते झाले त्यात तृप्ती साखरे यांनी महिलांना मिळालेले स्थानिक स्वराज्य संस्था यातील ५०टक्के आरक्षण, सैनिक दलात महिलांना प्रवेश, महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं तर त्या घराची, देशाची प्रगती होते, शक्ती कायदा, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अश्या अनेक पवार साहेबांच्या सामाजिक, राजकीय घडमोडींविषयी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले. आभार विजयमाला चवरे यांनी केले.