आजादी का अमृत महोत्सव निमित्त राजुरीत ध्वजारोहण व सेवानिवृत्त जवानांचा सन्मान
करमाळा समाचार – संजय साखरे
राजुरी ता. करमाळा येथे आजादी का अमृत महोत्सव “मेरी मिट्टी मेरा देश” या कार्यक्रमांतर्गत आज सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिलाफलकाचे अनावरण करून शहीद वीरांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी गावातील सेवानिवृत्त जवान मेजर अनिल साखरे, मेजर हनुमंत जगताप व मेजर निवृत्ती जाधव यांचा भारत देशाच्या संरक्षणार्थ दिलेल्या अमूल्य देशसेवेबद्दल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या अभियानामध्ये राजुरी ग्रामपंचायत तर्फे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राजुरी ग्रामपंचायतचे प्रशासक देविदास सारंगकर, ग्रामविकास अधिकारी रामेश्वर गलांडे, ज्ञानदेव दुरंदे ,संदिपान साखरे, मा. सरपंच डॉ. अमोल दुरंदे, आर आर बापू साखरे, दगडू भोसले, दत्तात्रय दुरंदे, नामदेव बोबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, बंडू टापरे, आप्पा टापरे, राजेंद्र भोसले, कैलास साखरे, परशुराम सारंगकर, रामदास दुरंदे,नामदेव जाधव,विलास मोरे,रावसाहेब शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व राजुरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
