वंजारवाडीत वृद्धाचा खुन ; संशयीताचा तपास सुरु
करमाळा समाचार
तालुक्यातील वंजारवाडी येथे आज सकाळी एका वृद्धाला डोक्यात जबर मारहाण करून जखमी केले. त्या वृद्धाचा दवाखान्यात नेण्यापूर्वी मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकरणात संशयताला शोधण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी भेट दिली व पुढील सूचना दिल्या आहेत.
वामन विठ्ठल दराडे (वय ६०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. वंजारवाडी येथील शेतात काम करण्याच्या निमित्ताने दोघेजणे शेतात गेले होते. सोबत असलेल्या व्यक्तीनेच डोक्यात मारून जखमी केल्याचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.
विठ्ठल दराडे यांना उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे. सदरची घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली व कोणी केली याबाबत तपास सुरू आहे.