करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शुल्लक कारणातुन सिंहगडने सोडले मैदान ; केबीपी पंढरपूर व बार्शीचा संघ विजयी

करमाळा समाचार

प्रतिस्पर्धी संघाची वाट बघताना खेळाडु

अतिशय अटीतटीच्या सामन्यात शुल्लक कारणावरून सिंहगड कॉलेज पंढरपूर या संघाने सामना मधूनच सोडून गेल्याने के बी पी पंढरपूर या संघाला विजय घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या सामन्यात बार्शी संघाने वेलणकर कॉलेज सोलापूर संघाचा सहा विकेटने पराभव केला.

उपांत्यपूर्व फेरीचे आज दोन सामने खेळवण्यात आले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर सिंहगड कॉलेज पंढरपूर विरुद्ध के बी पी कॉलेज पंढरपूर या दोन संघात सामना रंगतदार स्थित जाऊन पोहोचला होता. सुरुवातीला फलंदाजी करताना सिंहगड कॉलेजने ४० षटकात केवळ १०२ धावा जमवल्या. केबीपी पंढरपूर संघाकडून सोहेल काजी याने पाच बळी घेतले. तर साहिल कोताळकर यांनी तीन विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केबीपी पंढरपूर संघाचा ही पडझड झाल्याने 72 धावांवरच सहा फलंदाज बाद झाले होते.

त्यानंतर पंचांच्या नजरचुकीने वैयक्तिक मर्यादित षटके संपलेले असताना सिंहगड संघाच्या एका गोलंदाजाने गोलंदाजी सुरू केली व त्याला पंचांनी एक चेंडू झाल्यानंतर थांबवल्यामुळे पंचांवर आरोप करीत सिंहगड कॉलेज त्या ठिकाणाहून निघून गेले. यावेळी ठराविक काळासाठी सामना थांबवण्यात आला व दोन्ही संघांना पुन्हा मैदानावर बोलण्यात आले. पण सिंहगड कॉलेज पुन्हा माघारी फिरले नाही. त्यामुळे अखेर पंढरपूरच्या के बी पी कॉलेजला विजयी घोषित करण्यात आले. सामना थांबला त्यावेळी के बीपी संघाला वीस षटकात २८ धावांची गरज होती.

तर दुसरा सामना जैन मैदान येथे खेळण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय बार्शी या दोन संघात सामना खेळण्यात आला. यामध्ये वेलणकर संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४ षटकात केवळ १४७ धावा केल्या. यावेळी साईराज पिंगळे यांनी १७ धावा तीन बळी, प्रकाश लष्कर यांनी २३ धावा देत दोन बळी, अक्षय देशमाने यांनी २९ धावावर दोन बळी घेत बार्शीच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर बार्शी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने फलंदाजी करताना साईराज पिंगळे यांनी ५३ चेंडूत ६७ तर विशाल राऊत यांनी ३० चेंडूत ३५ धावा केल्याने बार्शीने हा सामना सहा गडी राखून जिंकला.

तर मंगळवारचे उपात्य फेरीचे सामने :
संगमेश्वर कॉलेज सोलापूर
विरुध्द केबीपी महाविद्यालय,पंढरपूर सकाळी 9 वाजता व क्रिडा संकुल(जीन मैदान) वालचंद महाविद्यालय, सोलापूर विरुद्ध श्री.शिवाजी महाविद्यालय,बार्शी सकाळी 9 वाजता

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE