करमाळ्यात पुन्हा एकदा रात्रीचे क्रिकेट सामन्यांचा थरार ; अभयदादा जगताप यांची घोषणा
करमाळा समाचार
मागील चार ते पाच वर्षापासून करमाळा तालुक्यात रात्रीचे सामने खेळण्यात आले नाहीत. तर करमाळ्यातील प्रेक्षकांना रात्रीच्या सामन्यांची मोठ्या प्रमाणावर उत्सुकता असते. सर्व तालुक्यातील क्रिकेट प्रेमी हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे येऊन गर्दी करतात आता पुन्हा एकदा त्यांची ही इच्छा पुर्ण होणार आहे.

शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत सुरू असलेल्या अभयसिंह जगताप करमाळा तालुका प्रीमियम लीग या स्पर्धकांच्या सामन्यांना सहा तारखेपासून सुरुवात झाली आहे. रोज सहा संघ याठिकाणी झुंझताना स्थाना दिसत आहेत. याच्यामधून तुल्यबळ संघाची अंतिम फेरीत लढत ही दहा जानेवारी रोजी होणार आहे.

या सदरच्या स्पर्धा अंतिम सामन्याच्या दिवशी सर्व सामने हे रात्रीच्या वेळी खेळण्यात येणार आहेत. यासाठी शिवक्रांती स्पोर्ट क्लब व अभय दादा मित्र मंडळ यांच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे करमाळा रसिकांची आवड लक्षात घेऊन अभय दादा जगताप यांनी सदरची घोषणा केली आहे.
आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ पूर्ण झालेला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी केम संघाने व दहिगाव संघाने सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे . तर आज व उद्या नेमके कोणते संघ सेमी फायनल पर्यंत धडक मारतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. या अंतिम दिवशी सर्वसामान्य हे रात्रीच्या वेळी लख्खप्रकाशात सायंकाळी पाच वाजता खेळवले जातील. याशिवाय हॅंगिंग डीजे आकर्षण असेल याची नोंद सर्वांनी घ्यावी.