करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

केम येथे गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक ; सोलापूर पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार 

धनाजी देविदास गाडे पोलीस हवालदार नेमणुक – स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे.

दिनांक 27/6/2021 रोजी मा.श्री. रविंद्र मांजरे, सहा. पोलीस निरीक्षक व (1) म.इसाक म.अबास मुजावर, सहा.पोलीस उप निरीक्षक (2) नारायण रामचंद्र गोलेकर (3) मोहन शामकर्ण मनसावाले (4) धनराज विलास गायकवाड, पोक(5) अक्षय सुहास दळवी, पोक (6) समीर अहमद शेख, चालक पोक याचेसह टेंभूर्णी ता. माढा येथील करमाळा बायपास चौकात आल्यानंतर सपोनि रविंद्र मांजरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे केम ता. करमाळा जि.सोलापूर येथील बेंदबाग तळेकर वस्ती मध्ये राहणारा इसम अरूण जनार्दन तळेकर हा आपले कब्जात गांजा अंमली पदार्थ बाळगून घरासमोर त्याची विक्री करीत आहे.

टेंभूर्णी येथील करमाळा बायपास चौकातून निघून कंदर केम मार्गे वर नमूद बातमीच्या ठिकाणी आले.  घरासमोर एक वयस्कर इसम लोखंडी कटवर बसलेला दिसला, त्याचे जवळ जावून त्यास सपोनि रविंद्र मांजरे यांनी पंचाची व पोलीसांची ओळख सांगून आमची झडती घ्यावयाची आहे का? असे विचारले असता त्यास त्याने नकार दिला. तेंव्हा त्याचे बाजूस एक पारदर्शक प्लास्टिकची पिशवीमध्ये मिळून आलेल्या हिरवी पाने बोंडे व बियासह असलेली गांजाची पिशवी मधून उग्र वास येत असल्याने व आतापर्यंतचे अनुभवावरून तो गांजाच असल्याचे निषपन्न झाले.

त्याचेकडे विचारपूस करता त्यांनेही गांजा असल्याचे सांगितले ती वेळ 14.45 वा. ची होती. तेंव्हा त्यास पंचासमक्ष त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव अरूण जनार्दन तळेकर वय 65 वर्शे रा. बेंदबाग तळेकर वस्ती केम ता. करमाळा जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले आहे. तेंव्हा भिंतीलगत असलेल्या धान्याचे पोती व रिकामे पोते बाजूला सारून पाहिले असता तेथे एक खाकी रंगाचे प्लस्टीक चिकटपटटी आवरण मध्ये पक असलेले चौकोणी आकाराचा एक पुडा, एक इलेक्ट्रीक वजन काटा, तसेच प्लास्टिकच्या गोणीमध्ये मोकळा गांजा मिळून आला.

(1) 49,410 – 00एक खाकी रंगाचे प्लस्टीक चिकटपटटी आवरण मध्ये पक असलेले चौकोणी आकाराचा एक पुडा तो पुडा उघडून पाहता त्यात हिरवी पाने,बोंडे व बियासह गांजा पकिगसह एकुण वजन 4 किलो 941 ग्रम असुन 10,000 रू. किलो या प्रमाणे एकुण किं.अं.रू.(2)11,550- 00एका पांढ-या रंगाच्या प्लास्टिक गोणीमध्ये गोणीस आतील बाजूस magspray magnesium sulphate असे निळया रंगात लिहिलेला असून त्यात गांजाची हिरवी पाने, बोंडे व बियासह असून गोणीसह एकत्रित वजन 1 किलो 155 ग्रम गांजा असून 10,000 रू. ग्रम प्रमाणे किं.अं.रू.(3) 4,580 -00एक खाकी रंगाचा कागद असलेला त्यावर खाकी कलरचा प्लास्टिक टेप चिटकाविलेला अर्धवट फाडलेला कागदी बक्ससह त्यात 0.458 ग्रम वजनाचा गांजा असून 10,000 रू. किलो या प्रमाणे एकूण किं.अं.रू.(4)16,000 -00 एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीमध्ये 1 किलो 600 ग्रम वजनाचा गांजा असून 10,000 रू. किलो या प्रमाणे एकूण किं.अं.रू.(5) 13,150-00रोख रक्कम नोटा गांजा विकून आलेली त्यात 500, 200,100, 50 रू. दराच्या नोटा गांजा विकून आलेले.(6) 00-00 गांजाच्या पुडया पकिंग करण्यासाठी एकूण 28 प्लास्टिक पिशव्या, 10X15 सें.मी. किं.अं.रू.(7) 00-00 गांजाच्या पुडया पकिंग करण्यासाठी एकूण 60 प्लास्टिक पिषव्या, 5X7 सें.मी. किं.अं.रू.(8) 1200-00 एक लवेंडर रंगाचा एसएफ-400 इंग्रजीमध्ये लिहिलेला डिजिटल बटरी सेलवरील चालू वजन काटा जू.वा.किं.अं.रू.(9) 50-00 एक कांगारू -10 इंग्रजीमध्ये लिहिलेला कंपनीचा स्टिलचा निळया रंगाचे प्लास्टिकचे फिंगर होल्डर असलेला स्टेप्लर एकुण किंमत 95,940 व  एकुण 8 किलो 154 ग्रम वजनाचा व किंमतीचा गांजा मिळुन आला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE