Uncategorizedकरमाळासोलापूर जिल्हा

पहिले ते नववीच्या निकालासाठी करावी लागणार प्रतिक्षा ; आता निकाल १ मे ऐवजी ..

करमाळा समाचार

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन 2023 व उन्हाळा सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सण 23 – 24 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्राथमिक शाळांचा निकाल आता 1 मे ऐवजी 6 मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष निमित्ताने दिला जाणार आहे.

याबाबतचे पत्रविभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, महानगरपालिका, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालिका, सर्व विभाग यांना सदरच्या पत्रांनी सूचना देण्यात आल्या आहेत.

politics

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन 2023 व शैक्षणिक वर्ष सन 2023 ते 24 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत तसेच सुट्टीचा कालावधी शाळांचे निकाल व नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादी बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एक मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

1) दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा.

2)राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक 6 मे रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन 2022 – 23 चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी पालकांना गुणपत्रकाचे वाटप वाटप करावे. तसेच निकाला सोबत उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.

3)शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2023- 24 सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा सूचनांचे पत्र शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group