करमाळ्यातील शंभर वर्षापुर्वीचे श्री विठ्ठल मंदीर जिल्ह्यात अनोखे
करमाळा समाचार
शहराच्या मध्यभागी शंभरहून अधिक वर्षाखाली एक विठ्ठल मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल मूर्ती सोबतच राही व रुक्मिणी या तिघांच्या मुर्त्या एकाच ठिकाणी आहेत. विठ्ठल नावाच्या महाराजांनी सदर मंदीराची स्थापना केली. तर मोरेश्वर पुराणिक यांना वयाच्या पाचव्या वर्षी असताना दत्तक घेतले. तेव्हापासून पुराणिकांची तिसरी पिढी या मंदिराची देखभाल करत आहे.

श्री विठ्ठल मंदिर करमाळा नगरीच्या मध्यभागी गुजर गल्ली मध्ये असलेल्या हे मंदिर शंभरहून अधिक वर्षाखालील आहे. मंदिराच्या परिसरात १०० हून अधिक वर्षाखालील एक पिंपळाचे झाड आहे, मंदिरावर विठ्ठल – विठ्ठल मंदिर नाव महाराजांच्या नावावरून देण्यात आले आहे. विठ्ठल महाराजांनी सदर मंदिराची स्थापना केली. त्यांनी करमाळ्यातील मोरेश्वर पुराणिक यांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी दत्त घेतले. तेव्हापासून ते आज पर्यत विठ्ठलाची पूजा पुराणिक परिवार करत आहे. ही पूजा शंभर वर्षाहून अधिक वर्षापासून चालू आहे.

मोरेश्वर रंगनाथ पुराणिक यांच्यापासून मुकुंद मोरेश्वर पुराणिक यांच्यानंतर ओंकार मुकुंद पुराणिक यांच्याकडून पाहिले जाते. मंदिराची रोज नियमितपणे सकाळी विठ्ठल पूजा केली जाते व त्यानंतर मंदिराचे दार भाविकांसाठी उघडले जातात. मंदिरामध्ये वर्षभर वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये तुकाराम बीज, ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा असे मोठे उत्सव साजरे करून त्याचे सप्ताह ठेवले जातात.
यानिमित्ताने ज्ञानेश्वरांचे पारायण, दासबोध, भागवत ठेवून प्रवचन, कीर्तन असा अखंड हरिनाम सप्ताह बसवला जातो. तसेच कोणतेही सण आणि नाम गजराने साजरे केले जातात. मकर संक्रांत, दसरा, पाडवा, गोकुळाष्टमीला तर बारा वाजता कृष्णाचा जन्म केला जातो. तसेच आठवड्यातून एकदा सोमवारी भजन केले जाते व एकादशीला कीर्तन ठेवले जाते. कार्तिक महिन्यात सर्व महिला मिळवून विठ्ठलाचा काकडा करतात.