अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर खडकेवाडी फाट्यावर अपघातात एक ठार
करमाळा समाचार
मोटरसायकल व ट्रकच्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात हा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर खडकेवाडी फाटा या ठिकाणी झालेला आहे.

नितीन पवळ वय 37 असे त्या मजुराचे नाव असून तो करमाळा येथे मजुरीसाठी येत असे रोज सायंकाळी उशिरा काम संपल्यानंतर तो आपल्या गावी पुन्हा जात होता. त्यामुळे आज दुपारी अचानक येईल असे कोणालाही वाटले नव्हते. पण आज दुपारी काम आटपुन तो घराच्या दिशेने जात असताना ट्रक सोबत त्याचा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

नेमका अपघात कसा झाला आहे. अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या मृत शरीर हे उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मत घोषित केले आहे.