एक लाख दहा हजार रुपये किमतीची जनावरे पाण्यात गेली वाहून ; भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे

दिनांक 14 रोजी पावसाने आपला रुद्र आवतार दाखवल्याने केतुर मंडलमध्ये 78 मिलिमीटर पाऊस याची नोंद झाली. त्यामध्ये जिंती येथील श्री बाळू सर्जेराव माने यांचा गट नंबर 16/ 3 असून त्याच्यामध्ये त्यांचे राहते घर आहे. तिथुन एक गाई व एक बैल वाहुन गेल्याने एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे.

घरा शेजारी बांधलेली गुरं पैकी एक बैल व जरशी गाय त्यांच्या शेतालगत असलेल्या ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वाहून गेल्याचे समजले. परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. एक बैल जरशा गाईची किंमत एक लाख दहा हजार रुपये इतके बाळू माने यांचे नुकसान झाले आहे. सदरचा पंचनामा गाव कामगार तलाठी संजय शेटे यांनी घटनास्थळी जाऊन केला. घटनास्थळी जिंती गावचे उपसरपंच गोरख रंगनाथ भोसले तसेच खातेदार दत्तात्रेय नामदेव वाघमोडे पंच म्हणून हजर होते.
माझे शेतातील पिकांचे व पशुधनाचे नुकसान मोठ्याप्रमाणावर झालेले आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.
– बाळू माने
नुकसानग्रस्त शेतकरी जिंती

माने यांचे पशुधन वाहून गेलेची माहिती मला उशिरा मिळाल्यामुळे मी घटनास्थळी पोहोचू शकलो नाही. पशुसंवर्धन विभाग तुमच्या सेवेशी आहे.
– मंगेश झोळ, वैद्यकीय अधिकारी, पशु
केतूर मंडल मधील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याबाबत वरिष्ठांचे आदेश आलेले आहेत. पाऊस उघडताच पंचनामे केले जातील. कोणाला काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा.
– सादिक काझी,
केतुर मंडल अधिकारी
महसूल विभाग