घराचे कुलुप तोडुन चोरी केलेल्या तीघांपैकी एकाला अटक ; आज पहाटे बंद घरातुन चोरले सोने
प्रतिनिधी – करमाळा
करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक तीन येथील एका घरात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून जवळपास दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. त्यातील एकाला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. सदरची घटना 27 जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी धनंजय तळेकर यांनी फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे अनोळखी तीन चोरटे 27 जुलै च्या रात्री दीडच्या सुमारास तळेकर यांच्या घराच्या दिशेने आले होते. घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश केला व घरातील एक लाख 17 हजार पाचशे रुपयांचे गंठण, 70 हजार पाचशे रुपयांचे दीड तोळ्याची सोन्याची फुलं व झुबे, 23500 ची अंगठी अर्धा तोळा, सोन्याचे मनी 14 हजार रुपये, चार हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल नेला आहे.
त्यातील एकाच पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे. यातील संशयीत हा त्याच गावातील आहे. त्याचे नाव गपात्या काळे आहे. पुढील तपास हा पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहे
