करमाळासोलापूर जिल्हा

सभापतीपदाच्या निवडीचा फक्त दिवस बदलला ; आजही पाटील यांचा बोलबाला

करमाळा समाचार 

करमाळा पंचायत समितीमध्ये सभापती निवडी वेळी केवळ एकच अर्ज आल्याने अतुल पाटील यांची सभापतीपदी निवड झाल्याची फक्त औपचारिकता बाकी असून शिंदे गटाकडून केलेला विरोध नेमका कशासाठी झाला होता हे अद्याप करण्यापलीकडे आहे. विरोध केला नसता तर मागील सात दिवसापूर्वीच सभापतीपदी पाटील यांची निवड होऊन कार्यवाही पूर्ण होणार होती.

करमाळा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीवेळी 10 ते 12 या कालावधीत अर्ज भरण्याची मदत होती. यादरम्यान केवळ पंचायत समिती सदस्य अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यांना सुचक म्हणून माजी सभापती गहीनीनाथ ननवरे यांनी अनुमोदन दिले आहे.

निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार समीर माने म्हणून तर सहअधिकारी म्हणून राजाराम भोंग यांनी काम पाहत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE