करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तालुका किसान काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी मोरवड तालुका करमाळा येथील दादासाहेब कुदळे

करमाळा –

करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी मोरवड तालुका करमाळा येथील दादासाहेब कुदळे यांची निवड माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार हुसेनजी हलवाई साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सहनिरीक्षक मोहनजी जोशी साहेब, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्री राहुल कौलगे-पाटील, करमाळा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या माढा लोकसभा पूर्वतयारी बैठकीच्या कार्यक्रमात करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडी- अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न हा माझा राहणार असून लवकरच करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीची कार्यकारणी तयार करून संपूर्ण तालुक्यामध्ये शाखा विस्तार करून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब, श्रीमती सोनियाजी गांधी, देशाचे भावी पंतप्रधान माननीय राहुलजी गांधी, माननीय प्रियंका जी गांधी, यांचे विचार खेड्यातील घराघरापर्यंत पोहोचून काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दादासाहेब कुदळे यांनी सांगितले.

यावेळी करमाळा तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपल्या मनोगतात करमाळा तालुका हा पूर्वीपासून काँग्रेस पक्षावर अतोनात प्रेम करणारा तालुका आहे. स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब यांचा वारसा पुढे चालवत असताना साहेबांना अभिप्रेत असलेले 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून प्रामुख्याने समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न हा माझा नेहमीच राहिला असून यापुढील काळातही काँग्रेस पक्षाला पूर्वीसारखे गत वैभव प्राप्त करून देण्याचा माझा संकल्प असल्याचे श्री प्रतापराव जगताप यांनी सांगितले.

करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी दादासाहेब कुदळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार हुसेनजी दलवाई साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सहनिरीक्षक मोहनजी जोशी साहेब, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी करमाळा तालुका ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, करमाळा तालुका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक घरबुडे, छगन मोहोळकर, करमाळा तालुका ओबीसी सेलचे उपाध्यक्ष भगवान डोंबाळे, प्रतीक जगताप, अशोक शिंदे, नितीन चोपडे, हर्षद काळे, दिनेश सालगुडे आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE