जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नं .3 येथे बाल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन
करमाळा समाचार -संजय साखरे
आज दिनांक 20/ 1/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर 3 येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन केले होते .सदर मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय रोकडे यांनी केले .प्रमुख पाहुणे सरपंच मयूर रोकडे होते .

बाजारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फळे,पालेभाज्या ,फळभाज्या, अंडी, वडापाव , भजी,चायनीज,भेळ ,चहा यांची दुकाने लावली होती .बाजारात एकूण 38650 रुपयांची उलाढाल झाली .गावात प्रथमच बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला .मुलांना व्यवहार ज्ञान समजले.आपण व्यवसाय करू शकतो याचा आत्मविश्वास आला.

यावेळी लक्ष्मण गोडसे, मारुती रोकडे, दत्ता मेन कुडले, , यशवंत भवर, जयवंत सातव ,नागेश खराडे ,मनोज तळेकर, बाळासाहेब कांबळे , प्रकाश तेलंग, नागनाथ वाघमोडे यांच्यासह सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य ,शाळा प्रेमी नागरिक,बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते .सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री आदिनाथ राऊत सर श्रीमती उज्वला भोंग मॅडम, श्री अशोक कणसे सर, श्री बाळू राठोड सर व सुतार मॅडम यांनी परिश्रम घेतले .