करमाळात फुल पीच क्रिकेट सामन्यांचे आयोजन ; खा. निंबाळकर व आ. राऊत यांची उपस्थिती
करमाळा समाचार
तालुक्यातील क्रिडारसिक व क्रिकेटप्रेमी खेळाडूंसाठी गणेश भाऊ चिवटे युवा मंच आयोजित जय श्री राम चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये असे असणार आहे. तर सर्व सामनेही युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत. यासामन्यांच्या उद्घाटनासाठी खा. ऱणजीतसिह नाईक निंबाळकर(ranajeetsinh naik nimbalkar) यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.

गाव वाईस पद्धतीचे सामने असल्याने या सामन्यांमध्ये रंगत येणार आहे. या सामन्याचे उद्घाटन मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी दहा वाजता बार्शीचे(barshi) आमदार राजेंद्र राऊत(rajendra raut) यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख जिल्हा अध्यक्ष भाजपा हे असणार आहेत. तर धैर्यशील भैया मोहिते पाटील(dhairyashil mohite patil), सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे हे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

या सामन्यांसाठी प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये व चतुर्थ पारितोषिक अकरा हजार रुपये ठेवण्यात आले आहे. सदरचे सामने हे जीन मैदान करमाळा येथे होणार आहेत. या सामन्यांसाठी गणेश भाऊ चिवटे युवा मंच करमाळा व शिवक्रांती स्पोर्ट क्लब करमाळा हे परिश्रम घेत आहेत.
यासाठी संपर्क करण्यासाठी महेश कदम 96 57 63 42 05, विश्वजीत परदेशी 911 204 05 04, (रोहित स्पोर्ट) रोहित परदेशी 99 21 58 74 58, अझर जमादार 93 07 12 62 12, अभिषेक शेलार 77 70 09 75 24 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.