करमाळ्यात नवरात्र महोत्सव निमित्ताने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा समाचार
नवरात्र महोत्सव निमित्त महिलांसाठी भव्य खुल्या स्पर्धांचे आयोजन व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन राजमुद्रा ग्रुप नवरात्र महोत्सव यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे सतीश फंड यांच्याकडून करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धा शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत देवीच्या माळ रोड, शिंदे हॉस्पिटल शेजारी, छोटू महाराज थेटर परिसरात शाहूनगर येथे होणार आहे.

स्पर्धेचे आयोजन माया भागवत, नलिनी जाधव, जोत्स्ना बनकर, तनुजा माने, पुष्पा गोसावी, सुनीता भोसेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.