ग्रामीण जागृकता व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन
जेऊर – प्रतिनिधी- अदिनाथ नगर
करमाळा तालुक्यातील आदिनाथ नगर (पांगरे) येथे कृषी महाविद्यालयात धुळे येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुजित राजेंद्र सरक याने ग्रामीण जागृकता व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन केले.

शेतकऱ्यांना चारा प्रकिया, बीज प्रकिया, माती परिक्षण यासह विविध विषयावर कॉरोनाच्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून चर्चासत्र व प्रत्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते . चारा प्रक्रिया कार्यकांसाठी डॉ. व्ही. यम. वसावे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी प्रगतशील बागायतदार चंद्रकांत पारेकर पाटील यांची मोलाची मदत मिळाली. तसेच पंडित कोपनर, दादासाहेब कोपनर, प्रसाद पारेकर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्याना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसाय केल्यास फायदेशीर ठरते. तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येते असे कृषिदूत सुजित सरक याने या प्रसंगी सांगितले . कार्यक्रमास कृषी महाविद्यालयात धुळे प्राचार्य डॉ. सी डी देवकर सर ,चर्मन यस पी सोनवणे सर, डॉ पी यन शेंडगे सर डॉ व्ही यम वसावे सर यांचे मार्गदर्शन मिळाले.
