सोलापूर जिल्हा

आवर्तन सुरू करण्यापूर्वी त्या भागात आ. संजयमामांचा उद्या पाहणी दौरा

प्रतिनिधी- करमाळा समाचार 

करमाळा विधानसभा मतदार संघाचे आ. संजयमामा शिंदे यांची काम करण्याची पद्धत निश्चितच वेगळी आहे. कोणताही प्रश्न ते अगोदर मुळापासून समजून घेतात आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व ताकद पणाला लावतात. हे त्यांच्या आजवरच्या कामातून दिसून आले आहे.

आमदार बनल्यानंतर लोकांचे हारतुरे ,सत्कार स्वीकारणे व त्यांना भलीमोठी आश्वासने देणे यात वेळ दवडण्यापेक्षा आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी कॅनलचा दोन दिवसाचा पाहणी अभ्यास दौरा केला . जवळपास दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीवरून करमाळा तालुक्याला येणारे पाणी , त्यात येणाऱ्या अडचणी , पाण्याची गळती , पाणी चोरी ,पाण्याचा वेग इत्यादी सर्व समजून घेऊन त्यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी केली. आणि त्यानुसार कुकडी ची तीन आवर्तने करमाळा तालुक्यासाठी अनुक्रमे जानेवारी , मार्च , आणि जून या महिन्यात सोडली .याच पद्धतीने दहिगाव उपसा सिंचन योजनेची दोन आवर्तने त्यांनी अनुक्रमे जानेवारी आणि मे या महिन्यात सोडली.

दहिगाव उपसा सिंचन योजना ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे या योजनेला अनेक मर्यादा पडतात .याचा परिणाम आवर्तनावरती होतो हे लक्षात आल्यामुळे आ. संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यापूर्वी त्याचा उद्या पाहणी दौरा करण्याचे निश्चित केले आहे. उद्या सकाळी 10 ते 01 या वेळेत दहीगाव व कुंभेज येथील पंपगृह व परिसर याची पाहणी करणे , वितरणकुंड क्र. 1 व क्र. 2 यांची पाहणी करणे , तसेच खडकेवाडी ते घोटी या मुख्य कॅनॉलवरच्या अडचणी , शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेणे असे त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. उद्या दुपारी 2 ते 5 या वेळेत गोदावरी महामंडळांतर्गत मराठवाड्याला पाणी देण्यासाठी उजनी ते कोळगाव धरण यादरम्यान करमाळा तालुक्यात बोगद्याचे काम सुरू आहे. जेऊर, सरपडोह ,सौंदे , शेलगाव ,अर्जुननगर याठिकाणी या बोगद्याच्या शाफ्ट आहेत . या शाफ्टला भेटी देऊन त्यांच्या अडचणीही आ. संजयमामा शिंदे समजून घेणार आहेत .याप्रसंगी कृष्णा खोरे महामंडळाचे व गोदावरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

 

आमदार संजयमामा शिंदे यांचा पाहणी दौरा कार्यक्रम…
दिनांक – 26.8 .2020.
वेळ – सकाळी 10 ते सायं. 05.

दहिगाव उपसा सिंचन योजना…
सकाळी 10 ते दुपारी 01 पर्यंत
या कालावधीत दहिगाव पंप हाऊस…
वितरण कुंड 1, वितरण कुंड 2 ,मुख्य कॅनॉल पाहणी , कुंभेज पंपगृह पाहणी तसेच खडकेवाडी ते घोटी या मुख्य कॅनॉलची पाहणी , तसेच याठिकाणी असलेल्या अडचणी समजून घेणे…

दुपारी 1 ते 2 भोजन व विश्रांती…

दुपारी 02 ते सायंकाळी 05…
गोदावरी महामंडळांतर्गत मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी सुरू असलेल्या कामाची पाहणी… शेलगाव , सौंदे , अर्जुननगर या गावात असलेल्या शाफ्टला प्रत्यक्ष भेट देणे .
त्यांच्या अडचणी समजून घेणे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE