अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा ; विविध मागण्यांचे तहसिलदार यांना निवेदन
करमाळा समाचार
करमाळा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिल कचेरी येथे केंद्राने केलेल्या इंधन दरवाढ व रासायनिक खते दर वाढ RTPCR(कोरोना टेस्ट)प्रशाशनाकडून लवकर मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले तत्काळ दरवाढ ही मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा लाॅक-डाऊन नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जन आंदोलन पुकारण्यात येईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष. ॲड शिवराज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे,नलिनी जाधव महिला तालुका अध्यक्ष,, राष्ट्रवादी काँग्रेस शहर-उपाध्यक्ष आजाद (भाई )शेख, युवा कार्यकर्ता आशपाक जमादार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष शिवाजी जाधव तालुका पदवीधर अध्यक्ष रवी वळेकर,राष्ट्रवादी चे युवक कार्यकर्ते मुस्तकीम पठाण व आदी कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते.