करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

जनतेने घाबरुन न जाता कोरोनाच्या संकटास तोंड द्यावे – माजी आमदार नारायण पाटील

प्रतिनिधी – करमाळा समाचार

माढा विधानसभा मतदार संघाचे  मा.आमदार नारायण (आबा) पाटील यांनी आज रोपळे व कव्हे ता.माढा या गावांना भेट दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मयोगी कै. गोविंद ( बापु ) पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, केमचे सरपंच युवानेते अजितदादा तळेकर यांचेसह आरोग्य विभागाच्या राखी भंडारी, जगताप, ढेरे तसेच सरपंच तात्यासाहेब गोडगे, युवासेनेचे हर्षल वाघमारे (कव्हे), उपसरपंच तानाजी दास, तंटामुक्ती अध्यक्ष शरद पाटील, आनंद गोडगे, फंड सर, धनाजी पाटील, नागनाथ मेहेर, अशोक मेहेर, शिवाजी लोंढे,  गणेश दास, अतुल दास, अनिल दास, डॉ. सय्यद,खाजा हुसेन पल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार श्री नारायण (आबा) पाटील यांनी जनतेने घाबरुन न जाता कोरोनाच्या संकटास तोंड द्यावे. आरोग्यविषयक सर्व सुचनांचे पालन करुन या विषाणुचा फैलाव रोखावा असे आवाहन केले. तसेच मी सदैव जनतेच्या पाठीशी असुन मतदार संघास चांगली आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर या भागातील रस्ते, वीज, पाणी आदि प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आपण पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. तर अनिरुद्ध कांबळे यांनी कोरोना निवारण व उपचारासाठी जि प कडुन आठ कोटी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून आता शासकीय रुग्णालयात जास्तीत जास्त आरोग्य सुविधा मिळवून देण्यात येतील असे सांगितले.

प्रास्तविक आ. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले. सुत्रसंचलन गणेश जगताप यांनी केले. यावेळी सरपंच तात्यासाहेब गोडगे, अजित तळेकर,हर्षल वाघमारे तसेच कव्हे व रोपळे येथील ग्रामसेवक आदिनीही मार्गदर्शन केले. संपुर्ण कार्यक्रमात सोशल डिस्टसींग तसेच मास्क व सॅनिटायझर या सहाय्याने दक्षता घेण्यात आली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE