प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार
चिखलठाण प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शेटफळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय. संपूर्ण गावाने केला आनंदोत्सव साजरा शेटफळ तालुका करमाळा येथील अमित गौतम लबडे याची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

अमितचे प्राथमिक सातवी पर्यंतचे शिक्षण शेटफळ गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल या ठिकाणी होऊन त्याने शास्त्र शाखेत पदवीचे शिक्षण घेतले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्याने या पदापर्यंत मजल मारली आहे.वडील अल्पभूधारक शेतकरी शाळा शिकत असताना सुद्धा वेळ मिळेल तेंव्हा वडिलांना मदत करत त्याने आपला अभ्यास केला.आज दुपारी आईवडील शेतात काम करत असताना आपला मुलगा पी.एस.आय परिक्षेत पास झाल्याची माहिती मिळताच आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले.
करमाळा तालुक्यातील युवकांची गरूड भरारी १) गुडसळी गावची कन्या आणि त्या गावच्या इतिहासातील पहीली पोलीस उपनिरीक्षक विद्या किसन कळसे २) शेटफळ गावचे सुपुत्र अमित गौतम लबडे तसेच ३)कोर्टी गावचे सुपुत्र दत्ता एकनाथ मिसाळ ४) सरपडोह गावचे सुपुत्र सागर जयवंत पवार ५) गौंडरे गावची कन्या सोनाली महादेव हनपुडे ६) चिखलठाण गावचे सुपुत्र निखिल ( सागर ) हिरामण सरडे ७) सोगाव चे श्रीकांत लक्ष्मण गोडगे ८) वीट गावचे सुपुत्र अभिजीत दत्तात्रय ढेरे ९) ओंकार दत्तात्रय धेंडे रा जिंती या ९ ही जणांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा –